महापौर आयुक्तांच्या पाठीशी

अधिकारी संघटनेने मुख्यमंत्रयांकडे तक्रार केल्यानंतर महापौरांची भूमिका

0
नाशिक, दि.७, प्रतिनिधी- आयुक्त असंसदीय भाषेचा वापर करतात, रात्री उशीरा सोशल मिडीयावर मेसेज टाकतात, अधिकारयांना अपमानास्पद वागणुक देतात, आयुक्त विलासी जीवन जगतात या व अशा अनेक तक्रारींचे पत्र महापालिका अधिकरी संघटनेने मुख्यमंत्रयाने दिल्याने महापालिकेत स्थानिक अधिकारी विरूध्द आयुक्त असा वाट पेटला.
याबाबत महापौरांची भूमिका जाणून घेतल्यानंतर त्यांनी आयुक्तांच्या कामाचे समर्थन केले. महापालिकेचे काम करून घेण्यासाठी आयुक्त कठोर पावित्रा घेत असतील तर त्यांना कायम पाठींबा राहिल असे मत महापौरांनी व्यक्त केले. महापालिकेतील काही अधिकारी आपले नेमून दिलेले काम वेळेवर करित नसल्याने नागरिकांची कामे खोळंबतात. शिवाय नगरसेवकांच्या प्रभागातील कामेही रखडतात.

अधिकारयांनी आपल्याला नेमून दिलेले काम वेळेत करणे अपेक्षीत आहे. आजवरच्या कारकिर्दीत आयुक्त अभिषेक कृष्णा हे उत्तम काम करीत आहेत. विकासकामांना ते कायम पाठींबा देतात. कर्मचारयांनाही सांभाळून घेण्याचे कसब त्यांचे चांगले आहे. महापालिकेतील करवसुली असो अथवा घंटागाडीचा प्रश्‍न, गोदावरी स्वच्छतेचा भाग असो वा अन्य कोणतीही विकासकामे याबाबत आयुक्तांचा कायम पुढाकार असतो.

त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाचे मी समर्थन करते, जिथे अधिकारी कामचुकारपणा करतात तिथे अधिकारयांवर कारवाई झालीच पाहिजे असे मत महापौर रंजना भानसी यांनी माध्यमांकडे व्यक्त केले. त्यामुळे महापौर याचाच अर्थ भाजपाचाही आयुक्तांना पाठींबा असेल असे सूतोवाच भानसींनी केले. स्थानिक अधिकारयांनी आयुक्तांविरोधात हत्यार उपसले असून, त्यांच्या कर्तव्यकठोरतेबाबत आता थेट मुख्यमंत्रयाकडे तक्रार केल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक अधिकारी विरूध्द आयुक्त असा वाद असल्याने या वादाचा परिणाम कर्मचारयांवर होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर अधिकारी संघटनेने ताशेरे ओढले असून यामुळे अधिकारयांचे मनोधेर्य खचले असून बहुतांश अधिकार सेवा न देण्याच्या तयारी आहेत शिवाय काहीनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करण्याचा विचार केला आहे. महापालिका अधिकारी संघटनेचे मोहन रानडे यांनी हे पत्र मुख्यमंत्रयाना पाठविल्यानंतर त्याचे पडसाद महापालिकेत उमटले. कर्मचारयांमध्ये याप्रकरणी चर्चा रंगली होती.

तर लोकप्रतिनिधींमध्येही हा विषय चर्चिला गेला. त्यामुळे या वादाचा अंत काय होणर अशीच चर्चा प्रत्येकात होती. परंतु याबाबत महापौरांनी आयुक्तांचे समर्थन केल्याने नवीन वाद उदभविण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्रयांच्या भूमिकेकडे लक्ष
महापालिका अधिकरी संघटनेने आयुक्तांविरोधात मुख्यमंत्रयांकडे तकार केल्याने वाद पेटला आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल मुख्यमंत्री किती घेतात याकडे अधिकारी संघटनेचे लक्ष लागले आहे. या पत्रावरून आयुक्तांवर कारवाई होते की, अधिकारयांनाच वचक बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*