त्र्यंबकच्या प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित कान्नव

0

त्र्यंबकेश्वर |(मोहन  देवरे) : त्र्यंबकेश्वर नगर पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित कान्नव यांची निवड झाली आहे.

नगराध्यक्षा विजया  लढ्ढा  रजेवर गेल्यामुळे त्र्यंबक नगरपालिकेचा  कारभार कान्नव यांच्याकडे आला आहे. त्र्यंबक येथील कान्नव घराण्याकडे पहिल्यांदाच हा बहुमान आला आहे.

श्री. कान्नव  हे भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला नगरसेवक  तसेच कान्नव समर्थक यांची  मोठी  गर्दी  होती.

यावेळी भाजपचे कार्यकर्ते  बाबुराव थेटे, सुरेश  शिखरे, कान्नव परिवारातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*