Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

मायावतींच्या भावावर कारवाई, 400 कोटींचा प्लॉट जप्त

Share

नवी दिल्ली – बसपा प्रमुख मायावती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात काल आयकर विभागाने मोठी कारवाई केली. आयकर विभागाने आनंद कुमार यांचा एक निनावी प्लॉट ताब्यात घेतला आहे. हा प्लॉट नोएडा येथे असून त्याची किंमत 400 कोटी आहे.

आयकर विभागाने आनंद कुमार यांच्या घरी जाऊन ही कारवाई केली असून त्यांच्या संपत्तीची झाडाझडती अद्यापही सुरूच आहे. यावेळी आनंद कुमार यांच्याकडे नोएडामध्ये 28,328 स्क्वेअर मीटरचा एक निनावी प्लॉट असल्याचं आढळून आलं. सात एकरामध्ये पसरलेल्या या प्लॉटची किंमत सुमारे 400 कोटी आहे.
दिल्लीतील बीपीयूने या निनावी प्लॉटला जप्त करण्याचे 16 जुलै रोजी आदेश दिले होते.

त्यामुळे आयकर विभागाने हा प्लॉट जप्त केला आहे. आनंद कुमार यांच्या आणखी काही बेहिशोबी मालमत्तांची माहिती आपल्याजवळ असल्याचा दावा आयकर विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. भविष्यात या मालमत्ता जप्त करण्यात येणार असून त्याचं थेट कनेक्शन मायावतींशी असल्याचंही बोललं जातंय.

संपत्तीत 18000 टक्क्याने वाढ
आनंद कुमार याच्या 1300 कोटीच्या संपत्तीची तपासणी सुरू आहे. 2007 ते 2014 पर्यंत आनंद कुमार यांच्या संपत्तीत 18000 टक्क्याने वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 7.1 कोटीने वाढून 1,300 कोटी झाली आहे. त्यांच्या 12 कंपन्याही आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!