सिन्नरच्या महिला अष्टपैलु खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

0
नाशिक । बीसीसीआयच्या वतीने खेळवण्यात येणार्‍या सिनिअर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात जिल्ह्यातील सिन्नर येथील अष्टपैलू खेळाडू माया सोनवणे व प्रियांका घोडकेची निवड झाली आहे.

बडोदा येथे 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान हे सामने खेळवण्यात येणार आहेत. माया व प्रियंका यांनी मागील महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या 19 वर्षाखालील महिला स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मायाने पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्वदेखील केले आहे.

महाराष्ट्र संघाचे दिल्ली, उत्तर प्रदेश, बडोदा व मुंबई यांच्या सोबत सामने होणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे सिन्नवासियांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करण्यात येत असून दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाव्यात अशी अपेक्षा सिन्नरकरांनी व्यक्त केली आहे.

माया आणि प्रियंकाच्या निवडीचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे यांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले आहे.

प्रियांका घोडके

LEAVE A REPLY

*