Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माऊली मल्टीस्टेटचे सात एजंट गजाआड; जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधीची केली फसवणूक

Share

नाशिक । प्रतिनिधी

जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि.च्या 7 एजंटसना शहर पोलिसांनी अटक केली आहे. ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींमधून या एजंटांच्या नावे 100 टक्के लाखो रुपयांची कर्ज काढून महागड्या कार खरेदी केल्याचे समोर आले आहे.

कृष्णा भुजंगराव वारे (39, रा. आनंदनगर, पाथर्डी, जि. नाशिक), मयूर सुनील पवार (27, रा.येवला जि. नाशिक ), प्रकाश अप्पासाहेब ननावरे (37, रा.नातेपुते, माळशिरस, जि.सोलापूर), धनंजय भीमराव सावंत (40, मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), दादा महादेव माने (26, तांबेनगर, एमआयडीसी, बारामती, जि. पुणे), नानासाहेब अशोक पायघन (35, तळवाडे गाव, ता. हवेली, जि. पुणे), रोहिदास शांताराम हजारे (48, रा. इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित एजंटची नावे आहेत.

महिनाभरापूर्वीच नाशिक पोलिसांनी मुख्य संशयित विष्णू भागवत यांच्या ताब्यातून 3 कोटी 33 लाख रुपयांच्या 10 महागड्या चारचाकी गाड्या जप्त केल्या होत्या; तर लवकरच इतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ऑक्टोबर 2015 ते जानेवारी 2019 याकाळात श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि व संकल्पसिद्धी प्रोडक्ट प्रा. लि. मध्ये गुंतवणूक म्हणून ठेवलेल्या रकमेच्या बदल्यात जादा परताव्याचे आमिष दाखवत जानेवारी 2019 मध्ये परतावा परत न करता कंपनीचे संचालक विष्णू भागवत यांनी फिर्यादी संंदीप भीमराव पाटील यांची एकूण 53 लाख 43 हजार 120 रुपयांची फसवणूक भागवत यांनी केल्याची तक्रार मागील वर्षी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर तपासाअंती पुढे आलेल्या तक्रारदारांनुसार आतापर्यंत एकूण 3 कोटी 83 लाख 68 हजार 308 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. तर इतर तक्रारदार पुढे आल्यास हा आकडा 20 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भागवत याने संचालक असलेल्या उज्वलम अ‍ॅग्रो मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीमधील ठेवीदारांनी सोसायटीत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेचा परतावा न करता ठेवीदारांना कोणत्याही प्रकारे माहिती न देता तसेच कृषी मंत्रालायाची परवानगी न घेता उज्वलमच्या ठेवी परस्पर श्री. माऊली मल्टीस्टेटमध्ये वर्ग करून त्यांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वरील कंपन्यांनी विविध योजनांच्या माध्यमांतून ग्राहकांकडून पैसे उकळले आहेत.

यासोबतच संशयितांनी सर्वसाधारण ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारत जमा रकमेतून ठेवी जमा करणार्‍या एजंटसला 100 टक्के कर्ज मंजूर करून रेंज रोव्हर, फोर्चुनर सारख्या महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यानुसार संबंधित एजंटांचा सहभाग आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्य संशयित विष्णू भागवत याचे एकूण 27 बँक खाती गोठवण्यात आली असून या खात्यांत 10 लाखांंची रक्कम आढळून आली आहे. यामुळे संशयिताच्या नावे असलेली माहिती प्राप्त करून मिळकती महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायदा 1999 कलम 4 अन्वये संलग्न करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!