‘मातृत्व अ‍ॅप’मधून गरोदर मातांची काळजी

0

नाशिक । दि. 12 प्रतिनिधी
प्रसुती दरम्यान गरोदर मातेच्या जीवाला काही धोका होईल का, जर तसे होणार असेल तर ही जोखीम टाळण्यासाठी कोणत्या वैद्यकीय उपाययोजना अवलंबवाव्यात, याची पूर्व कल्पना डॉक्टरांना देण्यासाठी मातृत्व अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे. जि.प.विभागाने नुकतेच हे अ‍ॅप गरोदर मातांच्या आरोग्याची नोंद घेण्यासाठी चार तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्रांत लाँच केले आहे.

मातृत्व अ‍ॅपमध्ये गरोदर मातांचे नाव, पत्ता, वय, उंची, वजन, हिमोग्लोबीनचे प्रमाण, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तघटकांचे प्रमाण, तसेच मागील प्रस्तुती दरम्यान उद्भवलेल्या समस्या आदी बाबींची नोंद या अ‍ॅपमध्ये होणार आहे.

ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकांकडून भरून घेण्यात येणार आहे. मातृत्व अ‍ॅप प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, तालुका आरोग्याधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अ‍ॅडड्राईड ऑपरेटींग सिस्टीमच्या हॅन्डसेटवर डाऊनलोड करून देण्यात आलेली आहे. तसेच महिलेल्या नोंदणीकार्डवर क्यु.आर. कोड असलेले स्टिकर लावून बारकोडींग करण्यात आलेले आहे.

त्यामूळे मातृत्व अ‍ॅपमध्ये नोंदवण्यात आलेली गरोदर महिलेची माहिती ती महिला कोणत्याही आरोग्य केंद्रावर उपचार अथवा प्रसुतीसाठी दाखल झाली की, तेथील नर्स, डॉक्टर तो कोड मातृत्व अ‍ॅप सुरु करून स्कॅन करतील.

त्यामूळे गरोदर माताची आरोग्य नोंदी तात्काळ नर्स आणि डॉक्टरांना समजतील, त्यानुसार पुढील उपचार करण्यास सुविधा होईल. त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंबोली येथील आरोग्य केंद्रात लाँच केलेल्या मातृत्व अ‍ॅपचा उपयोग करण्यात आला होता. यात गरोदर मातांच्या प्रस्तुती दरम्यान जोखीम कमी करण्यात हे अ‍ॅप उपयोगी ठरल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मातृत्व अ‍ॅप इगतपुरी,

LEAVE A REPLY

*