निम्म्याहून अधिक गणित-विज्ञान पेट्या उघडल्या नाहीत

0

जिल्हा परिषद : ओळखपत्र न बाळगणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांवर होणार कारवाई
अहमदनगर (प्रतिनिधी)– जानेवारी महिन्यांत जिल्ह्यासह मुंबईपर्यंत गाजलेल्या प्राथमिक शाळांना देण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या गणित-विज्ञान पेट्यांचा विषयावर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. सदस्य राजेश परजणे यांनी या पेट्यांची माहिती घेतली असता जिल्ह्यात निम्म्याहून अधिक ठिकाणी या पेट्यावरील धूळ झटकली गेली नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे बैठकीत या गणित-विज्ञान पेट्याबाबत अनेक गट शिक्षणाधिकार्‍यांना माहिती देता आली नाही.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शिक्षण समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी सदस्य परजणे यांनी गणित-विज्ञान पेट्यांचा विषय उपस्थित केला. यावेळी जिल्ह्यातील अनेक गट शिक्षणाधिकार्‍यांना माहिती देता आली नाही. अनेक ठिकाणी या पेट्यांवरील धुळ झटकली गेली नसल्याचे समोर आले. बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे हे देखील उपस्थित होते.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शालेय वेळेत आपल्या ओळख पत्राचा वापर अनिवार्य असतांना ओळखपत्र वापर नसल्याचे समोर आले आहे. या पुढे ओळखपत्र न वापरणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह अधिकारी कर्मचार्‍यांची हालचाल नोंदवही, पालक भेटीची वहीबाबत काटेकोर पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या. शाळा भेटीसाठी शिक्षणाधिकार्‍यांनी पथक तयार करून त्याव्दारे अचानक शाळा तपासणी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीला सदस्य जालींदर वाकचौरे, शिवाजी गाडे, उज्वला ठुबे, विमल आगवण, राहुल झावरे यांच्यासह शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, सुनंदा ठुबे, लक्ष्मण पोले आदी उपस्थित होते.
………
जिल्ह्यात जून 2016 पासून 68 विद्यार्थ्याचे अपघाती मृत्यू झाले असून 2 विद्यार्थ्यांना कायम अपंगत्व आलेले आहे. राजीव गांधी अपघात विमातून या विद्यार्थ्यांच्या वारसाच्या खात्यावर 51 लाख 75 हजार रुपयांचा निधी जमा करण्याचे यावेळी सुचित करण्यात आले.

LEAVE A REPLY

*