Type to search

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…

Share
कलाकार असण्याआधी आपण एका देशाचे सुजाण नागरिक आहोत ह्याची जाण ठेवत निखिल चव्हाणने आपल्या रसिक जनतेला निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मौलिक संदेश दिला आहे. ‘लागीरं झालं जी’ फेम निखिलने देशप्रेमी फौजी मित्राची भूमिका या मालिकेत साकारली होती.
विक्या साकारताना निखिलला आर्मीचे महत्त्व जरा अधिक पटलं तर झी ५ च्या ‘वीरगती’ वेबसिरीजद्वारा एक मेजरच्या भूमिकेतून त्याला आपल्या देशाला आणि सैन्याला भेसवणाऱ्या संकटांना सामोरं जातानाच्या वेदना जाणून घेता आल्या.
संवेदनशील मनाचा हा कलावंत सध्या चाललेल्या निवडणुकीच्या धामधुमीत मतदाराला शोधतोय. ‘विचार करून प्रतिनिधी निवडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा’ असं आपलं मत ठामपणे मांडणारा निखिल एका व्हिडियोद्वारे आपल्या मतदारांशी हितगुज करताना दिसतोय.
सध्या आपल्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध असतात अगदी सगळ्याच गोष्टींत केवळ मनोरंजनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहा ना… चित्रपट, मालिका, गाणी, इंटरनेट सर्फिंग… २४ तास सारं काही तुमच्या मनोरंजनासाठी तत्पर. बरं चॅनेल्स ते ही असंख्य. एक झालं की दुसरं..
अगदी मिनिटा-मिनिटाला तुम्ही चॅनल्स बदलू शकता. का बदलता कारण तुम्हाला बदल हवा असतो. तुमच्याकडे निवडीचे पर्याय उपलब्ध असतात. इतक्या साध्य गोष्टींत तुम्हाला बदल हवाच असतो शिवाय तुम्ही पर्यायही विचारपूर्वक निवडत असताना देशात दर ५ वर्षांनी घडणारा बदल तुमच्या नजरेतून कसा सुटतो?
भारत लोकशाहीप्रधान देश आहे. घटनेनुसार आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला असून ह्या देशाचे भवितव्य कणखर हातांत सोपवण्यासाठी आपण मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे.  जेणेकरून सत्ता एककेंद्री न राहता चांगल्या कर्तृत्वान नेतृत्त्व असणाऱ्यांच्या हाती सत्ता जाईल व देशाचं विकास होईल. असा संदेश देणारा निखिलचा व्हिडियो हलका-फुलका पण मार्मिक संदेश देतो.
कलाकारांचे फॅनफॉलोईंग प्रचंड असते. या फॅन्सच्या प्रेमाचा योग्य उपयोग कसा करायचा हे प्रत्येकालाच कळतं असं नाही. निखिलने किमान आपल्या प्रेक्षवर्गात ‘मतदान बजावा’ हा संदेश देत जनजागृती केली आहे जे वाखाणण्याजोगं आहे. निखिल नेहमीच देशसेवेला प्राधान्य देत आलेला आहे.
देशाप्रती असणारा अभिमान त्याच्या प्रत्येक कृतीतून नेहमीच झळकतो शिवाय आपल्या मनातील भावना तो नेहमीच सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांत दिसतो. तेव्हा तुम्हीही विचार करा…  मतदानाचा हक्क नक्की बजावा.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!