Video : बांद्र्याच्या रस्त्यावर सचिनचे ‘गल्लीक्रिकेट’

0
मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मैदानात क्रिकेट खेळताना सर्वांनीच बघितले असेल मात्र अचानक सचिन बांद्रा परिसरातील मेट्रो कामगारांच्या मुलांसमवेत क्रिकेट गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी थेट गाडीतून उतरतो आणि क्रिकेट खेळणारे सर्वच अवाक होतात.
विशेष म्हणजे गल्ली क्रिकेटचा हा व्हिडीओ सचिनचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी याने ट्वीटरवर पोस्ट केला. या व्हिडीओला भरभरून लाईक्स मिळाल्या असून सचिनच्या असंख्य फॅन्सने सचिनची या व्हिडीओतील फलंदाजी बघितली.
विराट कोहली  फॅन्स क्लब या इन्स्टाग्रामच्या खात्यावर सचिनच्या गल्ली क्रिकेट खेळण्याची जागा सांगण्यात आली असून ती जागा बांद्रा परिसरातील आहे. या परिसरातून सचिन घराकडे परतत असताना अचानक काही कामगारांची मुले क्रिकेट खेळताना दिसून आली. सचिनने आपल्या चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि सचिनने थेट गल्लीतले क्रिकेट ग्राउंड गाठले.

 

LEAVE A REPLY

*