सामुहिक आत्महत्या करू पण समृद्धीसाठी जमीन देणार नाही

0

सिन्नर | समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्यासाठी शासनाने जमिनींचे दर निश्चित केले.

त्यानंतर येथील शेतकरी एकवटले असून त्यांचा समृद्धी महामार्गाला विरोध असून आमच्या सुपीक जमिनी आम्ही देणार नाहीत.

प्रसंगी सामुहिक आत्महत्या करू तसेच फास लावून घेऊ असे सांगत येथील शेतकरी आजही या महामार्गाला विरोध करत आहेत.

शिवडे येथे काल स्वताची चिता रचून तसेच झाडांवर फासाचा दोर येथील शेतकऱ्यांनी बांधला होता. तसेच या परिसरात आता लोकप्रतिनिधींना प्रवेश देणार नसल्याचाही निर्धार येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

आजच्या आंदोलनात अनेक शेतकरी स्वतानेच रचलेल्या सरणावर जाऊन बसले आहेत. अनेकांनी डोक्यात समृद्धी महामार्ग रद्द करा अश्या लिखाणाच्या गांधीटोप्या परिधान केल्या आहेत. आज स्रीयादेखील या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे समृद्धी विरोध तीव्र झाला आहे.

LEAVE A REPLY

*