Type to search

Featured सार्वमत

‘मसाज’चा राजकीय ताप

Share

लेडीज होस्टोलजवळच ‘उद्योग’ । टग्यांमुळे विद्यार्थिनी बेजार

अहमदनगर (प्रतिनिधी)- हकेच्या अंतरावर हायवे.. शेजारीच हॉटेल अन् त्याबाजुला लेडीज होस्टेल… असा माहोल असलेल्या मेन स्पॉटवर स्वस्तिक चौक परिसरात मसाज सेंटरचा ‘उद्योग’ सुरू आहे. त्याभोवती घोंगावणार्‍या टग्यांमुळे विद्यार्थीनीना करिअर करावं की इमेज बिल्टअप करावी असा पेच पडालाय. ‘मसाज’ उद्योजगाच्या राजकीय ‘तापा’मुळे पोलिसही त्यात हात घालयाला तयार नाहीत. ‘नगर टाइम्स’च्या पहाणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

पुणे हायवे लगत असलेल्या या मसाज सेंटरला राजकीय वरदहस्त लाभल्याची माहिती हाती आली आहे. एका बड्या राजकीय नेत्याच्या आशिर्वादामुळे हा ‘मसाज’ उद्योग नगरात फेमस झाला आहे. फेमस ‘लेडीज स्पेशल’ मसाज सेंटरभोवती नेप्ती, नालेगाव भागातील टग्यांचा वावर असतो. दिवसभर ठाण मांडून असलेल्या टग्यांच्या घोळक्यातून वाट काढत मुली लेडीज होस्टेलमध्ये ये-जा करत असल्याचे चित्र भेटीत दिसले. बड्या घरच्या मुली, महिला या ठिकाणी मसाजसाठी येत असल्याचे दिसून आले. प्रस्तूत प्रतिनिधीने या मसाज सेंटरची माहिती घेतली असता, सेंटरचालक हा एका राजकीय नेत्याचा नातलग असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच पोलीस कारवाईच्या फंदात पडत नाही.

शिवाय वरकरणी मसाज सेंटरमध्ये ‘असं काही’ सुरू नसल्याचे भासविले जाते. पोलीस आले तरी त्यांना काहीच सापडणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे या सेंटरवर आजपर्यत कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती हाती आली. मसाज सेंटर संदर्भात ‘नगर टाइम्स’ने पूर्वीही वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर कोतवाली पोलिसांनीतेथे जाऊन तपासणी केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. छोट्याशा जागेत सुरू असलेला हा ‘उद्योग’ छोटा दिसत असला तरी त्यामागे मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. आता त्याचा शोध घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनासमोर आहे.

होस्टेलवाल्यांची तक्रार बेदखल!
शेजारीच असलेले लेडीच होस्टेल हे शासकीय आहे. त्यामुळे माफक दरात येथे राहण्याची सुविधा आहे. गरीबाघरच्या मुली या होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतात. घरची परिस्थिती गरीब असल्याने या मुली तक्रारीच्या भानगडीत पडत नाहीत. मात्र लेडीच होस्टेलच्या अधीक्षकांनी एसपींना यापूर्वी पत्रव्यवहार केला, पण त्याचा उपयोग झाला नाही, त्यामुळे आता नव्याने तक्रार केल्या नसल्याचे सांगण्यात आले. प्रतिनिधी ही माहिती घेत असताना त्याही दबावाखाली असल्याचे जाणवले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!