मारुती सुझुकीतर्फे ‘दे दिवाळी फेस्ट’चे आयोजन

0
नाशिक । ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या मारुती सुझुकीतर्फे ग्राहकांसाठी विशेष उत्सवी ऑफर्स देण्यात आली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला दि. 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान दिवाळी फेस्टचे आयोजन कण्यात आल आहे.

गंगापूर रोड वरील जेहान सर्कल जवळील ब्राह्मेचा प्लॉट येथे दे दिवाळी ऑटो फेस्टचे उद्घाटन ‘मारुती’चे प्रादेशिक व्यवस्थापक देवांग शुक्ला, टेरिटरी विक्री व्यवस्थापक सोहन बघेल, आदित्य तळवडेकर, एक्स्चेंज मॅनेजर अमिताभ कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मारुती सुझुकीचे अधिकृत डीलर सेवा ग्रुपचे सीईओ राजेश कमोद आणि विक्री व्यवस्थापक श्री विक्रम ऑटोमेटिव्हचे जनरल मॅनेजर कमलेश पांडे आणि सेल्स मॅनेजर अवधुत, शान कारर्स ग्रुपचे सीईओ अमोल गोसावी, जनरल मॅनेजर किरण यांची उपस्थिती होती.

येत्या दिपोत्सवात ग्राहकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मारुती सुझुकीच्या ऑटोमोटिव्ह, सेवा आणि शान कार्स या तिन्ही अधिकृत डीलर्सतर्फे सणाच्या निमित्ताने कार्सच्या विविध मॉडल्सवर स्कॅ्रच अ‍ॅण्ड विन सारख्या आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

यासह ग्राहकांना मारुती सुझुकी कारची ‘टेस्ट ड्राईव्ह देखील घेता येणार आहे. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यार्‍या फेस्टचा लाभ घ्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*