परंपरा डावलून चक्क आषाढ मासात होताहेत विवाह

0
गणोरे (वार्ताहर) – श्रद्धा आणि पंरपरा या शेवटी माणसाच्या विचारावरच अवंलबून असतात..हेच खरे…काळाच्या ओघात पंरपरा लुप्त होत असून..नव्या विचाराने लोकसमूह प्रवास करू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे….कालपरवापर्यंत आषाढ मासात नवीन लग्न झालेले पतिपत्नी एकमेकांचे मुखदर्शन घेत नव्हते. पण आता आषाढ मासात चक्क विवाह होत आहेत. त्यामुळे पंरपरा आता काळाच्या ओघात मागे पडत आहे.
आषाढ म्हटला की, लग्न झालेल्या नववधू माहेरी यायच्या. महिना-महिना माहेरवासाचे सुख अऩुभवायच्या..या काळात नवर्‍याचे मुख देखील पाहायचे नाही, अशी पंरपरा होती. ही पंरपरा कितीतरी काळ सुरू होती…अगदी पाच सहावर्षापर्यंत ही पंरपरा जपली जायची. एकत्रीत आलेल्या माहेरवाशिणी विचारांची, अऩुभवाची आनंदाने देवाणघेवाण करीत असायच्या.
त्याकाळात संपर्क माध्यमाचे आस्तित्व नव्हते. तेव्हा हा विरह अनेकांना अस्वस्थ करून जायचा. पुढे पुढे संपर्क माध्यमे वाढली. पत्नी माहेरला गेली तरी किमान संपर्क व्हायचा..त्यामुळे विरहातील वेदना काहीशा कमी होत गेल्या. पुढे महिला नोकरी करू लागल्या..एक एक महिना रजा टाकून माहेरचे सुख सोसणे कठीण होऊ लागले..मग किमान आठवडा भर माहेरी राहू लागले.. तेही अशक्य होऊ लागले तेव्हा एक दिवस पंरपरा जपण्याचा प्रयत्न होऊ लागला.
आता नोकरीचे ठिकाण…माहेर यातील अंतर लक्षात घेता पंरपरा जपणे कठीण वाटू लागल्याने विवाहित तरूणी या पंरपरेकडे दुर्लक्ष करताना पाहावयास मिळत आहे. वर्तमान पीढी सहभागी नाही..त्यामुळे ही पंरपरा काळाच्या ओघात आता जवळपास लुप्त होताना पाहावयास मिळत आहे. परंपराच्या अगदी विरोधी भूमिका वर्तमानात दिसत असून आता चक्क आषाढ मासात विवाह होऊ लागले आहेत.
कधीकाळी आषाढात विवाहाच्या तारखा निघत नसायच्या त्या आता तारखाही निघू लागल्या आहेत. त्यामुळे अखेर काय तर माणसांना जे वाटतेच तेच होते…पंरपरा संपुष्टात आल्याने नववधू मात्र माहेरच्या सुखाला पारख्या झाल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*