#Airtel : एअरटेलची 3G सेवा बंद होणार? फक्त 2G आणि 4G सेवा देणार!

0

देशातील भारती एअरटेल ही टेलिकॉम कंपनी आपली 3G सुविधा बंद कऱण्याचे नुकतेच जाहीर केले.

बाजारात काही दिवसांपूर्वी आलेल्या 4G सुविधेने नागरीकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले असतानाच येत्या 3 ते 4 वर्षात आपली 3G सुविधा बंद होणार असल्याचे एअरटेलने काही दिवसांपूर्वी जाहीर केले.

विशेष बाब म्हणजे 3G सुविधा बंद करण्याचा विचार करत असताना कंपनी आपली 2G सुविधा कायम ठेवणार आहे.

भारतात आजही 50 टक्के नागरिक फिचर फोन वापरत असल्यामुळे आपण 2G सुविधा कायम ठेवत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याशिवाय कंपनी 3G सुविधेसाठी वापरण्यात येणारी 2100 मेगाहार्टझ बँडचा वापर 4G सुविधेसाठी करणार आहे.

LEAVE A REPLY

*