मार्जिनमध्ये वाढ करण्याची रेशन दुकानदारांची मागणी

0
ना. चंद्रकांत पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात यावी, दुकानदारांना मालाचे वजन करून मिळावे यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी एक ऑगस्टपासून धान्याची उचल व वितरण न करण्याचा निर्णय घेऊन संपास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांनी धान्याची उचल केलेली नाही.
सरकारकडे वारंवार मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने रेशन दुकानदारांनी संपाचे हत्यार पुकारले आहे. प्रशासनाकडूनही त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी रेशन दुकानदारांनी मंत्री, विरोधी पक्षनेते आणि खासदार, आमदारांची भेट घेऊन आपल्या मागण्यांची निवेदने सादर केली आहेत.
जिल्हा संघटनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रेशनदुकानदारांची गार्‍हाणी मांडण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, रज्जाक पठाण, श्रीकांत म्हस्के, वहाडणे, भाऊसाहेब वाघमारे, चेचरे, लालमोहम्मद जहागीरदार, हेमंत कसबे, बाळासाहेब कडलग, रमेश अंभोरे उपस्थित होते.
माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना संगमनेर धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संजय फटांगरे वैशालीताई सांगळे व दुकानदारांनी निवेदन सादर केले.
कोपरगाव तालुका धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने आमदार स्नेहलताताई कोल्हे यांची जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाठक, तालुकाध्यक्ष कैलास बोरावके, पांडुरंग नरोडे, जनार्धन जगताप, राजेंद्र देवकर, उत्तम चरमल, सुनील बारहाते, आप्पासाहेब शिंदे, शीतल बडजाते, फकीर टेके आदींनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
अकोले धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष गणपत भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष पोपट दराडे, बन्सी अस्वले, हेमानाव पिंगळे, गणपत देशमुख, मारुती तांबेकर उपस्थित होते.
नेवासा तालुका धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने आमदार बाळासाहेब मुरकुटे व तहसीलदार नेवासा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश उभेदळ, बाळासाहेब देवखिळे, भाउसाहेब गंधारे, शांताराम गायके, संजय जाधव, मुनीर देशमुख, सचिन कडू, घोडेचोर, शेजुळ उपस्थित होते.

मार्जिन वाढीचा निर्णय ः खा. दिलीप गांधी –  भाजपा खासदार  दिलीप गांधी  यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष देविदास  देसाई,  रज्जाक पठाण भाउसाहेब वाघमारे, राहुरी तालुकाध्यक्ष जालींदर ढोकणे,  नगर तालुकाध्यक्ष विश्वासराव जाधव, श्रीकांत फाळके आदींनी  गांधी यांची भेट घेतली असता  खासदार  दिलीप गांधी  यांनी तातडीने  पुरवठा  मंत्री गिरीश बापट यांचेबरोबर संघटनेची बैठक घेण्याबाबत आश्वासन दिले .व शासन दुकानदाराबाबत सकारात्मक असून मार्जीन वाढवून देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगितले.

या आहेत मागण्या…
स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात यावी, दुकानदारांना मालाचे वजन करून मिळावे, माल दुकानात थप्पी मारून मिळावा, आधार फिडींगचे काम शंभर टक्के पूर्ण केल्यावरच पॉश मशिनची सक्ती करण्यात यावी,दुकानदारांना मदतनीस ठेवण्याची परवानगी देण्यात यावी,वधवा कमिटीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात,रॉकेल परवानाधारकांना गॅस वितरणाचा परवाना देण्यात यावा.

LEAVE A REPLY

*