Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या‘देवाक काळजी रे’ या गाण्याने रचला इतिहास; तो कसा? जाणून घ्या…

‘देवाक काळजी रे’ या गाण्याने रचला इतिहास; तो कसा? जाणून घ्या…

नाशिक | मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग झालेले बघायला मिळतात. मराठी चित्रपटातील गाण्यांची चर्चा बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये होऊ लागली आहे.

प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या ओठावर असलेले कमालीचे प्रसिद्धीस आलेले ‘देवाक काळजी रे’ या गाण्याने एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे  ‘रेडू’ चित्रपटातील  असलेले हे गाणे यूट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूज (१० कोटी) मिळाले असून, मराठी चित्रपट संगीतातील हा विक्रम मानला आहे.

- Advertisement -

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकलेला हा चित्रपट १८ मे २०१८ रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच या गाण्याने मराठीच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर केले.

गीतकार गुरू ठाकूरने हे गाणे लिहिले आहे, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन केलंय आहे तर अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे.

जेमतेम दोन वर्षांत गाण्यानं १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठणं अतिशय आनंददायी आहे. या गाण्याच्या व्हिडिओखाली आलेल्या कमेंट्समध्ये काहींनी नैराश्य दूर झाल्याचे, काहींनी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाल्याचे लिहिले होते. परिवर्तन कुठेतरी झाल्याचा आनंद आहे मला वाटते हा या गाण्यासाठीचा सर्वांत मोठा पुरस्कार आहे. असे दिग्दर्शक सागर वंजारी म्हणतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या