Type to search

हिट-चाट

लवकरच ‘अग्गंबाई सासूबाई’तुन तेजश्री प्रधानचे कमबॅक

Share

मुंबई : मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसतील.

दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याबद्दल तेजश्री म्हणाली, “एक काळ असा होता जेव्हा मी नाटक, मालिका आणि चित्रपट एकत्र करत होती. माझ्या अनेक चाहत्यांना मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायचं होतं आणि त्यांनी तशी इच्छा देखील माझ्याकडे व्यक्त केली. चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळले असं मी म्हणेन.

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका २२ जुलै रोजी प्रेक्षक आणि चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ही एक हलकी फुलकी मनोरंजक मालिका असणार आहे आणि प्रेक्षकांना ती आवडेल अशी मी आशा करते.”

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!