Type to search

हिट-चाट

प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायचंय : अमृता धोंगडे

Share

मुंबई : झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली. मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. मालिकेतील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतं. सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

पदार्पणातच प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत असल्याने अमृता भारावून गेली आहे. प्रेक्षकांची प्रतिक्रिया विचारली असता अमृता म्हणाली, “प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. एक आजोबा मला रोज कॉल करतात. ते मला सुमे म्हणतात. ते रोज माझं काम मालिकेत बघतात आणि ते कॉल करून मला सांगतात कि तू आज असा अभिनय केलास, आज सुमीने हे केलं. मला तुझं काम खूप आवडतं.

या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या मला काम करण्यासाठी प्रेरणा देतात. सुमी नक्कीच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे पण आता सुमीला प्रेक्षकांच्या मनात पोहोचायचं आणि त्याच्या मनात स्थान निर्माण करायचंय. लोकांना माझं काम आवडावं आणि प्रेक्षकांनी माझ्या प्रेमात पडावं हीच माझी इच्छा आहे.”

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!