Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसंमेलनासाठी जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी

संमेलनासाठी जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाने 50 लाख रुपये दिल्यानंतर आता 25 लाख रुपयांच्या निधीसाठी संमेलनाच्या आयोजकांनी आपला मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला आहे. मात्र अशी काही तरतूदच नसल्याने निधी द्यायचा कुठून असा पेच अधिकार्‍यांपुढे निर्माण झाला आहे. अधिकार्‍यांनी तसा प्रस्ताव ग्राम विकास खात्याकडे पाठविला आहे.

- Advertisement -

साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. तेवढाच निधी महापालिकेनेही द्यावा, अशी मागणी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली. तर आता संमेलन आयोजकांनी जिल्हा परिषदेकडे 25 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेकडे असा कोणातही निधी देण्याची काहीच तरतूद नसल्याने अधिकारीच पेचात पडले आहेत.

मात्र यावर तोडगा काढत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लीना बनसोड यांनी हा प्रस्ताव ग्राम विकास खात्याकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आता तसा प्रस्ताव पाठविल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी सांगितले. त्यामुळे आता ग्रामविकास खाते कोणती भूमिका घेते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या