Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedबालकुमार मेळाव्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग

बालकुमार मेळाव्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नुकत्याच पार पडलेल्या बालकुमार मेळावा समितीच्या बैठकीत आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरले आहे. तसेच समिती सदस्यांवर विविध कामांच्या जबाबदार्‍या सोपवण्यात आल्या.

- Advertisement -

बाल कविकट्टा विषयी मार्गदर्शन करतांना समितीप्रमुख संतोष हुदलीकर म्हणाले, प्रत्येक सभासदाने 5 शाळा निवडायच्या. प्रत्येक शाळेकडून 5 कविता मागवायच्या. बाल संमेलनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी 25 जिल्ह्यात वनवासी कल्याण आश्रम, वसतिगृहे, आश्रमशाळा यांच्याशी संपर्क साधायचा, आलेल्या कवितांपैकी 200 कविता निवडल्या जातील. उपप्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ व योगिनी जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

संमेलनाचे कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. कथा सादरीकरण ही कला आहे. त्यादृष्टीने मुलांकडून सराव करून घ्यावा. मुलांच्या स्वरचित कविता पुस्तकरुपात प्रसिद्ध कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संमेलनातील नियोजित कार्यक्रम, बाल साहित्यिकांचा सहभाग, ग्रंथदिंडी यावर चर्चा झाली. त्यात संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर, नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, राजेंद्र उगले, स्नेहल काळे यांनी भाग घेतला.

असे झाले कामांचे वाटप

प्रसिद्धी व दैनंदिन कामकाज समिती – स्नेहल काळे, मुग्धा थोरात, सुचेता महादेवकर, नोंदणी समिती – अभिजित साबळे, श्रीराम कुलकर्णी, संपर्क समिती – गीता बागुल, राजा वर्टी, अर्चना सूर्यवंशी, सुनीता पाटील, कविता निवड समिती- संजय वाघ, संदीप देशपांडे, उत्तम कोळगावकर, राजेंद्र सोमवंशी, अरुण इंगळे, किरण भावसार, कथा निवड समिती- राज शेळके, विवेक उगलमुगले, संजय गोरडे, सुहासिनी बुरकुले, धारा भांड मालुंजकर, हीरा वाघ,

मंच व्यवस्थापन – निलेश गायधनी, संदीप पगारे, अनिल माळी, प्रमाणपत्र समिती – प्रकाश वैद्य, संजय कोंटूरवार, पूजा गायधनी. सूत्रसंचालन समिती – राजेंद्र उगले, प्रशांत केंदळे, किरण भावसार, संयुक्ता कुलकर्णी, सुरेख बोर्‍हाडे, शिल्पा करंजकर, छाया लोहोकरे, डॉ. मंजुषा सोनार, सल्लागार समिती – मिलिंद कुलकर्णी, मुग्धा थोरात, सविता कुशारे, अंजना भंडारी, ज्योती फड, भारती देव, पोस्टर मेकिंग – मुक्ताताई बालिगा, राहुल पगारे, सुवर्णा देसले,

अल्पोपहार समिती – सुनील बस्ते, निशिकांत पगारे, वैशाली शिंदे, अनुराधा आगाशे, शिस्तपालन/नियंत्रण समिती – अनघा जोशी, गौरी कदम, प्रियदर्शना कुलकर्णी, अश्विनी बेलगावकर, सचिन भामरे, कचरू वैद्य, स्वागत समिती – चित्रा थोरे, अभिजित साबळे, साहित्य वाटप समिती – जयश्री बस्ते, मंजुषा सोनार, श्रेया गरुड, छाया लोहकरे.

समितीच्या सदस्यांना मिळणार ओळखपत्र

साहित्य संमेलनानिमित्त जवळपास 39 समित्या कार्यरत असून या समित्यांमधील 644 सदस्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. अनेक समित्यांनी अद्याप त्यांच्या समितीतील अंतिम नावांची शिफारस आणि आवश्यक ते माहितीपत्रक भरून संयोजकांना पाठविलेले नाही. ही माहिती प्राप्त झाल्याशिवाय समिती सदस्यांना ओळखपत्र देता येणार नाही. त्यामुळे यासाठी आता 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. या तारखेनंतर कोणत्याही समिती सदस्याचे ओळखपत्र तयार करणे शक्य होणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.

प्रत्येक 5 समितीवर प्रमुख, उपप्रमुखांसह सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व समित्यांमध्ये तब्बल 644 सदस्य आहेत. समितीच्या बैठकांना गैरहजर राहणार्‍यांना विनम्रपणे थांबविण्याचे सूचित करण्यात आले आहे. सर्वच समित्या कार्यान्वित झाल्यामुळे अधिकारांसह जबाबदारीचे विकेंद्रीकरण झाले आहे. समिती प्रमुख आणि सदस्यांना संमेलनासाठी खास ओळखपत्र दिले जाणार आहे.

या सर्वांचे ओळखपत्र तयार करणे ही महत्त्वाची बाब आहे. परंतु अद्यापही अनेक समिती प्रमुखांनी आपल्या समितीतील अंतिम नावांची शिफारस आणि आवश्यक ते माहितीपत्रक भरून संयोजकांकडे पाठविलेले नाही. प्रत्येक समितीतील सदस्य आणि समिती प्रमुखांनी शिफारस केलेले सदस्य या सर्वांचे ओळखपत्र तयार करणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी माहिती सादर करण्याची 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. या तारखेनंतर कोणत्याही समितीतील सदस्यांचे माहितीपत्रक स्वीकारणे किंवा ओळखपत्र तयार करणे शक्य होणार नाही, असे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या