नाशिक | प्रतिनिधी

९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भव्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना आयाेजकांकडून संमेलनस्थळी सर्व शक्यता पडताळून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय उपाययाेजना कराव्या लागतील यावर उहापाेह सुरू केला आहे...

या संदर्भात झालेल्या पहिल्या बैठकीत संमेलनाच्या दृष्टीने येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्कालीन समस्यांवर चर्चा झाली. आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर चर्चा झाली.

त्यानुसार सर्वप्रथम मेडिकल इमर्जन्सी, फायर ब्रिगेड, ओन कॉल सर्व्हिस आणि जवळील हॉस्पिटल यांच्या समवेत टायप करणे व १० इमर्जन्सी बेड तयार करणे संदर्भात चर्चा झाली. संमेलनाच्या दृष्टीने प्रत्येक गेटवर रूग्णवाहिका, कार्डीयाक, प्रथमोपचाराची सोय असणे आवश्यक आहे असे सर्वानुमते ठरले आहे.

संजय भडकमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न ही बैठक पार पडली. संमेलनाचे पालकत्व श्याम पाडेकर व मुख्य समन्वय शविश्वास ठाकूर यांनी दिलेल्या कार्यप्रणाली प्रमाणे संपन्न झाली. सभासद निलेश तिवारी (उपप्रमुख) मोनल नाईक (उपप्रमुख) तसेच अमित शहा, मिलिंद पत्की, डॉ. राजेंद्र नेहेते उपस्थित होते.