नाशिककर संमेलनाध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

नाशिककर संमेलनाध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

न्यायखात्यात जाण्यापूर्वी व नंतरही अनेक विषयांवर त्यात इतिहास, कायदा अर्थशास्त्र, साहित्य यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सातत्याने लिखाण केले होते. 1899 साली ‘मराठा शक्तीचा उदय’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठीत प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा परामर्श घेतला होता, तो त्यांना फारसा समाधानकारक वाटला नाही.

फार कमी पुस्तकांची निर्मिती झाली हे रानडे यांच्या लक्षात आले. हे ग्रंथ वाचनाच्या बाबतीतील एकंदर उदासीनतेचे लक्षण आहे हे ओळखून आपल्या देशात ग्रंथांचा प्रसार व्हावा, वाचकांना पुस्तके कमी किमतीला मिळावीत, या हेतूने विचारविनिमय करण्याकरता न्यायमूर्ती रानडे यांनी लोकहितवादी यांच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचा प्रथम प्रयत्न केला.

त्या आवाहनानुसार 11 मे 1878 रोजी पुणे येथे हिराबागेत मराठी साहित्यिकांचे पहिले संमेलन भरले. संमेलनाची कल्पना न्यायमूर्ती रानडे यांची असल्यामुळे संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. ही घटना भारतातसुद्धा पहिली होती. न्यायमूर्ती रानडे यांना संमेलनाध्यक्ष होण्याचा मान त्यांच्या वयाच्या 36 व्या वर्षी मिळाला होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाडचा. अशी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली ही नाशिक जिल्ह्याचे भूषणच आहे.

: मिलिंद मधुकर चिंधडे, 9423968964

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com