नाशिक । प्रतिनिधी

करोनाची साथ वाढत असली तरी संमेलनासाठी एक महिन्याचा अवधी आहे. या काळात परिस्थिती निवळण्याचीआपण प्रतीक्षा करणार आहोत. गरज भासल्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाची स्वागत समिती यांच्याशी सल्लामसलत करून साहित्य संमेलनाबाबतयोग्य तो निर्णय घेतला जाईल असे संमेलनाच्या आयोजकांनी जाहीर केले आहे.

94 व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नाशिकमध्येसध्या जोरदार तयारी सुरू आहे. तथापि नाशिक शहरात दिवसेंदिवस करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सावधानता म्हणूनसाहित्य संमेलनाच्याकाही समित्याऑनलाईन तर काही समित्यासुरक्षिततेचे सर्व नियम पाळत प्रत्यक्ष बैठका घेत आहेत. शासनातर्फे जाहीर केल्या जाणार्या नवीन धोरणामुळे व त्याच्या कार्यवाहीमुळे तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती लवकरच निवळेल अशी आशा आहे.

परिस्थिती निवळण्याचीवाट पाहण्याची भूमिका आहे. याबाबतीत शासनाच्या वेळोवेळी दिल्याजाणार्या निर्देशानुसार कामे केली जातील असे आयोजकांनी म्हंटले आहे.