Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसंमेलनासाठी डिजिटल मार्केटींगचा शुभारंभ

संमेलनासाठी डिजिटल मार्केटींगचा शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सोशल मिडीया आणि डिजीटल मार्केटींग समितीची बैठक नुकतीच झाली. यात सदस्य हेमंत बेळे, अमोल जोशी, आदित्य नाखरे, मिथिलेश मांडवगणे, अभिजीत अष्टेकर, नितीन बिल्दीकर, राहुल रायकर, सुमीत गोखले, पालक सदस्य : फणिंद्र मंडलीक यांच्या उपस्थितीत मागील बैठकीत ठरल्या प्रमाणे समंमेलानाच्या सोशल मिडीया वा डिजीटल मार्केटींगचा शुभारंभ करण्यात आला. संमेलनाचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर पेज तसेच यु ट्युब चॅनल सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

संमेलनाची सोशल मिडीया पेजेस फॉलो, लाईक करण्याचे आवाहन आयोजक वा डिजीटल मार्केटींग समिती मार्फत करण्यात आले आहे. या पेजेस वर विविध प्रकारची साहित्य विषयक माहिती, व्हिडीओज , सेलेब्रीटी बाईट्स , संमेलानासंबधी माहिती, ताज्या घडामोडी, नियमावली, आयोजकांचे कॉन्टॅक्टस, अशा अनेक गोष्टी असणार आहेत.

संमेलनाच्या अधिकृत वेबसाईटचा आराखडा ठरवण्यात येऊन, वेबसाईटच्या कामाची सुरूवात करण्यात आली. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सोशल मिडीया आणि डिजीटल मार्केटींग समितीच्या बैठकीत संमेलनाच्या सोशल मिडीया पेजचे लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर व मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या