Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसाहित्य संमेलन समित्यांच्या सभांमध्ये विविध विषयांवर चर्चा

साहित्य संमेलन समित्यांच्या सभांमध्ये विविध विषयांवर चर्चा

नाशिक । प्रतिनिधी

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक च्या विविध समित्यांच्या सभा संमेलन कार्यालयात झाल्या. स्वच्छता, पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था समितीच्या सभा पालक पदाधिकारी सुनील भुरे व प्रमुख सुनील वाणी यांच्या उपस्थितीत झाली.

- Advertisement -

संमेलनकाळात तिन्ही दिवस संमेलन परिसरात 24 तास किमान 2 घंटागाडी उपलब्ध करणे, मनपाचे किमान 20 स्वच्छता कर्मचारी सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत परिसरात उपस्थित राहतील याची काळजी घेणे, दररोज संध्याकाळी फॉगिंग होईल हे पाहणे , भोजनस्थळी परिसरात पूर्णपणे स्वच्छता राहील याची दक्षता घेणे, किमान 100 ठिकाणी डस्टबीनची व्यवस्था करणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे या विषयांवर चर्चा झाली. या सभेस नंदकिशोर हरकुट, सौ. रोहिणी रकटे, हिमांशू धोडपकर, तुषार सावरकर आदी समिती सदस्य उपस्थित होते.

संयोजन व नियोजन समितीची सभा समिती प्रमुख प्रशांत व प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली, तसेच प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. दि. 26 ते 28 मार्च 2021 रोजी प्रमुख कार्यक्रम असल्याने त्या दृष्टीने मंडप उभारणी, स्टेजची व्यवस्था, निमंत्रण पत्रिकांचे वाटप, प्रमाणपत्र वाटप, बाहेरून आलेल्या पाहुण्याची व्यवस्था, रसिकांची उपस्थिती, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, स्टॉलधारकांना येणार्‍या अडचणी, पोलीस यंत्रणा व शासन यंत्रणेशी संपर्क आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

तसेच संमेलनादिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कवी कट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत. यातील नियोजनावर चर्चा झाली व त्याप्रमाणे नियोजन करण्याचे ठरले.

यावेळी मिलिंद कुलकर्णी, प्रीतम नाईक, विद्या खरात, अ‍ॅड. अविनाश देशपांडे, रुपाली नेर, पराग घारपुरे, महेंद्र बच्छाव, डॉ. भास्कर गिरिधारी, मंगेश मालपाठक आदी उपस्थित होते.तसेच सत्कार समिती, काव्यवाचन व नियोजन समिती व सभामंडप सजावट समितीच्याही सभा संपन्न झाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या