‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ भव्य महानाट्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ महापराक्रमी योद्ध्याची शौर्यगाथा आता ‘अजिंक्य योद्धा’ या नाट्यरूपाने आपल्या समोर येणार आहे.

संजय ह. पांडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या तसेच पंजाब टॅाकीजची निर्मिती असलेल्या ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाट्याला लवकरच प्रारंभ होणार आहे.

वरुणा मदनलाल राणा दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे लिखित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे हे ‘महानाट्य’ आहे.

या महानाट्यातून ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांचा इतिहास आणि जीवनचरित्र उलगडले जाणार आहे.

या महानाट्यातील गाणी गायक आदर्श शिंदे, नंदेश उमप, वैशाली माडे यांनी गायली आहेत. आदर्श शिंदे यांनी गायलेलं शीर्षकगीत अप्रतिम झाले आहे.

LEAVE A REPLY

*