आता नाशिकहून विमानाने जाता येणार परदेशात

जेट एअरवेजकडून अखंड सेवेची हमी

0

नाशिक । दि. 31 प्रतिनिधी – नाशिकहून दिल्लीपर्यंत जेट एअरवेजची विमानसेवा येत्या १५ जूनपासून सुरू होणार असून संलग्न (कनेक्टींग) सेवेद्वारे थेट परदेशातही आता नाशिककरांना जाता येणार आहे.

नुकत्याच उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत सेवा अखंडीत ठेवण्याची हमी देत देशांतर्गत सेवेसह परदेशातील प्रवासासाठी संलग्न विमान सेवेचीही हमी जेट मार्फत देण्यात आली.

या सेवेकरता नाशिकमधील उद्योजकांसह नागरीकांचेही सहकार्य लाभावे अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली. या सेवेमुळे आता दोन तासांत दिल्ली गाठणे शक्य होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांची मागणी असलेल्या नाशिक ते दिल्ली ही विमानसेवा केंद्र सरकारच्या ‘उडान’ या योजनेंतर्गत सुरू होणार आहे.

त्यानूसार कंपनीमार्फत 15 जूनपासून दिल्ली-नाशिक आणि नाशिक-दिल्ली अशी आठवड्यातून तीन दिवस विमान सेवा सुरू करीत आहे.

नाशिक-दिल्ली विमानसेवा अखंडीत राहावी याकरीता निमाने पुढाकार घेतला असून याकरीता आज सर्व उद्योजक संघटनांची बैठक निमा हाउस येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जेट एअरवेजच्या जनरल मॅनेजर रूचिका सिंग, एरिया मॅनेजर यझदी मर्कर, खा. हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*