‘सविता दामोदर परांजपे’चं बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश

0
मुंबई : सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे. बॉलीवूड सिनेमाबरोबरच मराठी सिनेमा सृष्टीला देखील चांगले दिवसमान सुरु झाले असल्याची चर्चा पाहायला मिळते आहे.

अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलं आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ च्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्तम थरारपटाची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटाला पहिल्या तीन दिवसामध्ये प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ लाख, दुसऱ्या दिवशी ३४ लाख, तर तिसऱ्या दिवशी ५२ लाख रुपयांची कमाई केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या चित्रपटाने तीन दिवसामध्ये एक कोटी रुपयांचा गल्ला जमावल्याचं दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*