मराठी चित्रपटाचे नटसम्राट श्रीराम लागू यांच्या भूमिकेत सुमीत राघवन

0
मुंबई : आपली अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेमामध्ये आपली छाप सोडणारे अभिनेते तसेच मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांच्या अभिनयाची कलाकारी आपण चित्रपटामध्ये पहिली आहे. अभिनेता सुमीत राघवन लवकरच डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका तो साकारणार आहे. मुख्य म्हणजे या व्यक्तीरेखेच्या रुपात सुमीतने एक मोठी जबाबदारीच हाती घेतली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण, आपल्या अभिनयाने नटसम्राट ठरलेल्या या अभिनेत्याची कलाकारी साकारणे हे मोठे जिकरीचे काम आहे.

एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने याविषयीची माहिती दिली. ज्यामध्ये त्याने डॉ. लागू यांची भेट घेते वेळची काही छायाचित्रंही पोस्ट केली आहेत. ‘एवढ्या मोठ्या माणसाचे जीवन साकारणे म्हणजे तारेवरची कसरत होती. शूटींगच्या आधी डॉ.लागूंचे आशीर्वाद मिळाले हे माझं भाग्यच म्हटलं पाहिजे. निखिल साने आणि माझा दिग्दर्शक अभिजीत देशपांडेचे सुद्धा मनापासून आभार कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. प्रचंड उत्सुकता आणि तितकीच धाकधूक होतेय.. कुठेही उथळ किंवा त्यांची नक्कल माझ्याकडून होता कामा नये याची पूर्ण दक्षता बाळगली आहे…’, असं सुमीतने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर’ या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोटेक्टमधून त्याचं हे रुप पाहता येणार आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०१८ला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*