मराठी चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकप्रमुखपदी नजान यांची नियुक्ती

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या जिल्हा भरारी पथक प्रमुख व जिल्हा मुख्य समन्वयक पदावर नगरचे प्रसिद्ध रंगकर्मी व चित्रपट अभिनेते शशिकांत नजान यांची नियुक्ती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे. महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयात नजान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी खजिनदार संजय ठुबे, विनय जवळगीकर तसेच महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मागील वर्षी जिप्सी प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यातील चित्रपट कलाकारांचा मेळावा चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या उपस्थित आयोजित केला होता. त्यात सर्वानुमते चित्रपट माहामंडळचे कार्यालय आणि शाखा नगर येथे व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट महामंडळ संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नगर शाखेला मान्यता देण्यात आली आहे.
लवकरच शहरात कार्यालयाची जागा निश्चित करून उद्घाटन करण्यात येणार अशी माहिती नजान यांनी दिली.
चित्रपट महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व कामकाज, तसेच भरारी पथकाची जबाबदारी आपण स्वीकारत असून महामंडळाच्या ध्येय धोरणे आणि नियमानूसार काम करताना कलाकारांच्या, सभासदांच्या हिताचे कार्य केले जाईल, पद हे माध्यम असून संस्थेपेक्षा व्यक्ती मोठी नसते, याच भान सतत आपणास असेल असे निवडी नंतर शशिकांत नजान यांनी मनोगत व्यक्त केले. नजान यांच्या या निवडी बद्दल नाट्य, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्रात अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

*