‘अट्टाहास’ चित्रपटाच्या शुटिंगला प्रारंभ

0
नाशिक | दि. १८ प्रतिनिधी- तेजम आणि स्काय फिल्मस निर्मित, अण्णा हांडोरे दिग्दर्शित ‘अट्टाहास’ या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला आज त्र्यंबकेश्‍वर येथील तळवाडे येथे प्रारंभ झाला.

मा. नगरसेवक ऍड. तानाजी जायभावे व चित्रपट टिमने गणेशपूजन करून चित्रपटाच्या शुटिंगला प्रारंभ झाला. चित्रपटातून जीवन जगण्याचा, प्रेमाचा, समाजसुधारणेचा, अहंकार जपण्याचा ‘अट्टाहास’ जपण्यासाठी माणूस काय करू शकतो, हे दाखवण्यात आले आहे.
उदरनिर्वाहासाठी देवळाली कॅम्प परिसरातील फायरींग रेंजमध्ये स्फोट झाल्यानंतर स्फोटके जमा करणार्‍या मागास समाजावर चित्रपट आधारित आहेत. चित्रपटाचे निर्माते दिनकर गरूड व विकास इंगळे आहेत.

सहाय्यक दिग्दर्शक सचिन कांबळे, कथा महेश गरूड, पटकथा-संवाद सदानंद दळवी, डिओपी राम वासणीक, संगीत अतूल दिवे, गाणी डॉ. पुरुषोत्तम भापकर तर गायन आदर्श शिंदे, बेला शेंडे यांचे आहे. चित्रपटात राहूल पाटील, अनुजा चौधरी, सुनील भटकर, सलमान तांबोळी, प्रभाकर मोरे, जयराज नाथर, सचिन तोरणे, सागर शिंदे, श्याम कुलकर्णी, राजेंद्र काळे यांच्या भूमिका आहे.

LEAVE A REPLY

*