‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपट अमेरिकेतील थिएटरमध्ये झळकणार

0
मुंबई : मराठी चित्रपटांची परदेशवारी ही काही आता नवीन गोष्ट नाही. पण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे या चित्रपटाने मिळवला आहे. गेल्या शुक्रवारी ३१ ऑगस्टला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आणि शुक्रवारी (७ सप्टेंबर) अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकणार आहे.

ऑस्टिन, शिकागो, लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन, सॅनफ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात ‘सविता दामोदर परांजपे’ प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने १ कोटीच्या उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील २३२ चित्रपटगृहांतून या चित्रपटाचे दररोज ४१० शो दाखविले जात आहेत. बऱ्याच काळानंतर एक उत्तम थरारपटाचा अनुभव प्रेक्षक घेत आहेत.

LEAVE A REPLY

*