डिजिटल दीपोत्सव २०१८

देशदूतचा ऑनलाईन दिवाळी अंक

निमित्त

ओके गुगल!

आपल्या दैनंदिन व्यावसायिक कामात अनेक नावे आपल्या परिचयाची होतात आणि आपलीच वाटायला लागतात. गेली २० वर्षे टेक्नॉलॉजीत काम करताना मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, अ‍ॅपल, आयबीएम, एचपी, फेसबूक... ह्या नावांशी रोजच संबंध येतो. इतका की ते आपल्या जीवनाचा रोजचा भागच आहे असे वाटते. (ह्यातच त्यांच्या यशाचे गमक आहे!) मात्र प्रत्यक्षात जेव्हा ह्यातल्या काही कंपन्या पाहता आल्या, तेव्हा शहारून आले. कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलित...
सन २०१८ मिझोराममध्ये एक घर फुगे आणि रोषणाईनं सजलं होतं. नृत्य-संगीत चालू होतं. फुलांची उधळण होती. कारण होतं, नुकत्याच जन्मलेल्या मुलीचं स्वागत त्या घरी होत होतं. ‘बेटी बचाओ’ अभियानाचं महत्त्व आता देशाच्या कानाकोपऱ्यातही समजू लागलंय. पण काही वर्षांपूर्वी असं नव्हतं... सुमारे सात वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘‘आता तरी मुलगा हू दे रं बाबा, नायतर नंदिनीला सवत यील, नवरा तिला घरात घेणार नाही’’ असं म्हणत आकाशाकडं...

अनुभव

गावाकडची दिवाळी : येउंद्यारे येऊंद्या वाघ्याची भोई वाघे…

येउंद्यारे येऊंद्या वाघ्याची भोई वाघे...सकाळपासून आवाज चालू होता. मी खटकन गोधडीतून बाहेर आलो. दोन चार मुलांच्या टोळक्या गल्लोगल्लीत फिरत व्हत्या. मग मी आईकडंन पिशवी...

डिजिटल दिवाळी अंकाच्या निमित्ताने..

देशदूत-सार्वमतच्या डिजिटल दिवाळी अंकाचे यंदाचे दुसरे वर्ष. दैनिक किंवा माध्यमांच्या डिजिटल आवृत्तीच्या स्वतंत्र म्हणता येईल असा डिजिटल दिवाळी अंक देशदूतने मागील वर्षी प्रथमच प्रकाशित केला. २० वर्षांपूर्वी भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन ऑनलाईन आवृत्ती सुरू करतानाही दैनिक देशदूत आघाडीवर होते. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रातील पहिला ई-पेपर (डिजिटल पेपर) प्रसिद्ध करण्याचा मानही देशदूतकडेच जातो. आज आधुनिक साज ल्यायलेल्या देशदूत डिजिटलचा आत्मा मात्र अस्सल मराठमोळा,  वाचककेंद्रीत राहिला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाचकांना दिवाळीत चांगलंचुंगलं वाचायला मिळावं यासाठी या डिजिटल दिवाळी अंकाचा हा प्रपंच. अंक कसा वाटला? आम्हाला नक्कीच प्रतिक्रिया कळवा. लेखाच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्येही आपण प्रतिक्रिया नोंदवू शकता.

रिपोर्ताज

error: Content is protected !!