INSTA : शनायाने घेतली ‘क्रेटा’!

0

मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार व दिग्दर्शकांकडेही आता महागड्या आणि आलिशान गाड्या दिसू लागल्या आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील हिनेही नुकतीच तिची पहिली गाडी घेतली.

रसिकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच रसिका इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. आपली पहिलीच गाडी घेण्याचा आनंदही तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला.

रसिकाने ‘ह्युंडाई क्रेटा’ ही पांढऱ्या रंगाची गाडी घेतली.

नव्या गाडीसोबतचे फोटो शेअर करत तिने लिहिलं की, ‘अरे आली रे…. माझी पहिली नवीन गाडी….’ या पोस्टमध्ये रसिकाने तिच्या वडिलांचेही आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

*