रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ सिनेमाचं पहिलं गाणं ‘दिस येती’ रिलीज

0

मुंबई : सध्या सर्वांच्या चर्चेचा तसेच उत्सुकतेचा विषय बनलेला रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. सिनेमातील ‘दिस येती’ या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं कल्याणी मुळे या अभिनेत्रीने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. सिनेमाचे नावावरून चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. कोण आहे न्यूड आर्टिस्ट? कशा तयार होतात न्यूड आर्टिस्ट? समाजात न्यूड आर्टिस्टला काय वागणूक मिळते? यासारख्या प्रश्नांवर रवी जाधवचा न्यूडा हा सिनेमा भाष्य करतो. दिस येती हे गाणं झी म्युझिक मराठीच्या अंतर्गत प्रदर्शित झालं असून ते सायली खरेने संगीतबद्ध केलं आहे.

न्यूड सिनेमावर होती बंदी

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर एस दुर्गा या महोत्सवातूनही हा सिनेमा वगळण्यात आला होता. इतकंच नाही तर सिनेमासाठी रवी जाधव कोर्टाची पायरीही चढले. या सगळ्यात मात्र मराठी सिनेसृष्टीने रवी जाधव यांना पाठिंबा दिला. अनेक खडतर अडचणीवर मात करत न्यूड प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*