होणार सून मी या घरची ‘फेम’ या अभिनेत्याने केले गुपचूप लग्न!

0

होणार सून मी या घरची मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेतील जान्हवी, श्री या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच पिंट्या, ताई मावशी या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या.

रोहन गुजरने या मालिकेत साकारलेल्या पिंट्या या भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका संपून अनेक महिने झाली असली तरी प्रेक्षक आजही त्याला याच नावाने ओळखतात. तो नुकताच बन मस्का या मालिकेत झळकला होता.

रोहनने नुकतेच त्याची प्रेयसी स्नेहल देशमुख सोबत गुपचूप लग्न केले आहे. त्यानेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना दिली आहे. त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत आम्ही अतिशय साधेपणाने लग्न केले असे लिहिले आहे.

रोहनने त्याची मैत्रीण स्नेहल देशमुखसोबत जून महिन्यात साखरपुडा केला होता.

रोहनने फेसबुकला त्याच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून त्याच्या साखरपुड्याची बातमी त्याच्या फॅन्सना दिली होती.

साखरपुडा गुपचूप केल्यानंतर आता रोहनने लग्न देखील गुपचूपच करणे पसंत केले आहे.

LEAVE A REPLY

*