Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हरसुल महाविद्यालयात भाषा गौरव दिनानिमित्त कविसंमेलन

Share

हरसुल | प्रतिनिधी

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हरसूल येथे मराठी भाषा गौरव दिन काव्य सम्मेलन आयोजित करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राजेंद्र सांगळे उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख होते कविसंमेलनात महाविद्यालयातील एकूण 39 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

अनेक दर्जेदार कविता यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल्या.  प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र सांगळे यांनी आपल्या मनोगतात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या साहित्याची ओळख करून देत काव्य निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती दिली मराठी व हिंदीतील दर्जेदार कवितांची उदाहरण देत त्यांनी कविता कशी बहरत जाते हे स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांनी कविसंमेलन ठेवण्यामागचा हेतू स्पष्ट करीत महाविद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ. प्रकाश शेवाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रा. गणेश बारगजे सूत्रसंचालन केले.

डॉ. रजनी पाटील यांनी परीक्षण केले उपप्राचार्य डॉ. एम पी पगार यांनी आभार मानले. या कविसंमेलनासाठी उपप्राचार्य प्रा. देवानंद  मंडवधरे प्रा.बी. डी पगार आरके सूर्यवंशी प्रा.दत्तात्रय जाधव प्रा. बापू देवरे, नाना कोर पत्रकार पोपट महाले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!