Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या हिट-चाट

तरुणाईच्या दिलाची धडकन सोनाली कुलकर्णी हिच्याशी मनमोकळ्या गप्पा

Share

तरुणाईच्या दिलाची धडकन, सगळ्यांची लाडकी हिरकणी, म्हणजेच सोनाली कुलकर्णी, ही उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका म्हणून आपल्याला ठाऊक आहेच. ‘युवा डान्सिंगक्वीन’ या कार्यक्रकामधून आता ती परिक्षकाच्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या या गप्पा…

१. परीक्षक म्हणून तुझ्या भावना काय आहेत?

एखाद्या टीमसोबत पुन्हा एकदा काम करायची संधी मिळते तेव्हा खूप छान वाटतं. आपण चांगलं काम केलेलं असल्याची ती पावती असते. ‘झी युवा’सोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.  अप्सरा आली’ या कार्यक्रमापेक्षा निराळा असा हा कार्यक्रम करण्याची संधी मिळणार आहे. एका वेगळ्या प्रयोगाचा मी भाग आहे याचा मनापासून आनंद आहे.

२. हिरकणी’नंतर पुन्हा एकदा तू प्रेक्षकांसमोर येणार आहेस.  आता तुला परिक्षकाच्या खुर्चीत बसायचे आहे. या भूमिकेविषयी काय सांगशील?

‘युवा डान्सिंग क्वीन’बद्दल मी खूप उत्सुक आहे. अभिनय क्षेत्रातून आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या तारका, आता डान्सर म्हणून पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या ‘रील लाईफ’सोबतच,  रिअल लाईफ’ सुद्धा यातून पाहायला मिळेल. वेगवेगळ्या रुपात दिसणाऱ्या या तारकांचा नृत्याविष्कार पाहणं, नक्कीच आवडेल. या सर्व स्पर्धकांकडून मलाही खूप काही शिकायला मिळेल अशी आशा आहे. परीक्षक म्हणून काम करायचा अनुभव मस्तच असेल, याची खात्री वाटते.

३. परीक्षण करत असताना, नेमके कोणते मुद्दे तुझ्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत?

स्पर्धक त्यांच्या प्रवासात काय काय प्रयोग करतात, त्यांच्यात कशी सुधारणा होते हे माझ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. सगळ्याच जणी उत्तम डान्सर्स आहेत. काहींनी नृत्य शिकलेलं नाही, त्यांना या प्रवासात शिकायला मिळेल याची खात्री आहे. स्पर्धक काय काय नवीन घेऊन येतात, याकडे सुद्धा माझं लक्ष असेल. जे स्पर्धक, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मंचावर नृत्य सादर करणार आहेत, त्यांचा ‘अंडरडॉग ते स्टार’ असा होणार असलेला प्रवास सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा असेल.

४. मयूर वैद्य तुझ्याबरोबरीने परीक्षण करणार आहे. त्याच्याविषयी काय सांगशील?

मयूर वैद्य हा माझा खूप लाडका मित्र आहे. त्याच्यासोबत याआधी मी काम केलेलं आहे. तो एक अत्यंत गोड व्यक्ती आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. सध्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे. एकत्र काम करायला आम्हाला खूप मजा येते आहे. अर्थात, मयूर कथ्थकचा गुरू आहे, त्यामुळे त्याच्याकडून कथ्थक शिकायला सुद्धा मला खूप आवडेल. शूटिंग सुरू झाल्यापासूनच इतकी मजा येत असल्याने, मयूर सोबत काम करत असताना आणखी काय काय अनुभवायला मिळेल याची मला उत्सुकता आहे.

५. या कार्यक्रमाची संकल्पना खास आणि वेगळी आहे. त्याविषयी तुझं मत काय आहे?

स्पर्धकांना एकमेकींना वोटआऊट करण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे. ही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची खासियत ठरेल. स्पर्धकांमध्ये चुरस आणि स्पर्धा तर असतेच, याशिवाय त्यांना एकमेकांकडून शिकायला मिळते, त्यांच्यात मैत्री होते. केवळ एखादा स्पर्धक आपल्यापेक्षा उजवा आहे, म्हणून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न न करता, खिळाडूवृत्तीने या वोटआऊटचा वापर त्या कशा करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.  यासगळ्यामुळे पुढे नक्की के घडेल, हे परीक्षक म्हणून पाहणं सुद्धा रंजक ठरेल. आपण सगळेजण मिळून हा फॉरमॅट कसा हाताळू हे बघण्याची मला आता खूप स्तसूक्त आहे. याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील. हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अवश्य पहावा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!