ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

0

मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे झोपेत निधन झाले. दोन- तीन दिवस ताप आल्यामुळे गोरेगाव येथील रुग्णालयात होत्या अॅडमीट. मात्र आज पहाटे झोपेतच राहत्या घरी त्यांचे निधन झाले. शुभांगी कुंकू टिकली मधली जीजी आणि काहे दिया परदेसमधील आजीच्या भुमिकेवर रसिकप्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकांप्रमाणेच शुभांगी यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

…कोण होत्या शुभांगी जोशी ?

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या उत्कृष्ठ आजी होत्या. त्यांनी साकारलेल्या आजीच्या भूमिका साऱ्यांच्याच स्मरणात आहेत. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत त्यांनी साकारलेली गौरीची आजी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तसेच ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत शुभांगी जोशी यांनी मालवणी आजी साकारली होती. त्यांच्या मालवणी भाषेने प्रेक्षकांना अधिक जवळ केलं. तसेच ‘आभाळमाया’ या मालिकेत देखील त्यांनी साकारलेली आजी अतिशय लोकप्रिय होती. आभाळमाया या मालिकेत त्यांनी साकारलेली आजी ही वेगळी होती.

LEAVE A REPLY

*