स्वप्निल जोशीला पुत्ररत्न..

0

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.

स्वप्निलची पत्नी लीना हीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाळ आणि तिची प्रकृती उत्तम आहे.

स्वप्निल आणि लीना 16 डिसेंबर 2011 ला विवाहबद्ध झाले होते. 2016 मध्ये त्यांना कन्यारत्न लाभले.

मायरा सध्या दीड वर्षांची आहे. मायराच्या या छोट्या भावाच्या आगमनाने जोशी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

स्वप्निलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

*