Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

आज मंत्रालयात ‘मराठा आंदोलनावर’ महत्वपूर्ण बैठक

Share
आज मंत्रालयात 'मराठा आंदोलनावर' महत्वपूर्ण बैठक, maratha reservation meeting breaking-news

मराठा आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट

मुंबई | प्रतिनिधी 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सुरु असलेल्या आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट घेतली. यावेळी खासदार सुळे यांच्याशी विविध मागण्यांवर आंदोलकांनी चर्चा केली शिवाय मागण्यांचे निवेदनही दिले.

गेल्या सात दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलकांच्या भेटीनंतर आज संध्याकाळी साडेचार वाजता सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजीराव जोंधळे आणि दोन्ही पक्षांचे वकील व  बैठकीला आंदोलनातील सहभागी चार समन्वयक देखील सहभागी होणार आहेत.

याबाबतची माहिती खासदार सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मराठा आंदोलकांचे शिष्टमंडळाच्य्ता भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!