13 जुलैला श्रध्दांजलीसाठी कोपर्डीला जाण्याचा निर्णय

0
नाशिक । येत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातून सहभागी होणार्‍यांची नाव नोंदणी करण्याचा व याकरिता जिल्हाभर बैठकांचे आयोजन करण्याचा निर्णय आज (दि.6) घेण्यात आला. याचबरोबर येत्या 13 जुलै रोजी कोपर्डी येथे आयोजीत श्रध्दांजली कार्यक्रमांत सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेणण्यात आला.

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा नियोजन समितीची महत्व पूर्ण बैठक आज शहरातील नांदूर शिवारातील वरद लक्ष्मी लाँन्स (औरंगाबाद रोड नाशिक) येथे झाली. यात उपस्थित मराठा सकल बांधवांनी आपल्या मौलीक सूचना व अपेक्षा मांडुन समाज हितासाठी एकत्र येत 09 ऑगस्ट मराठा क्रांती मुंबई मोर्चा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

यात मोर्चासाठी जिल्हा, तालुका, शहर समिती गठीत करून पुढील नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. यात संपर्क कमिटी गठीत करून पुढील नियोजनात समाज बांधवांनी आपले नांव नोंदणी करावी. तसेच जागृतीसाठी तालुका, गावपातळीवर बैठकाचे नियोजन करण्यासाठी तारीख व वेळ ठरविण्यात आली .

LEAVE A REPLY

*