संगमनेरातून मराठा क्रांती मोर्चा साठी शेकडो कार्यकर्ते रवाना 

0

संगमनेर (प्रतिनिधी )– मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी संगमनेरातून मोठया संख्येने कार्यकर्ते रवाना झाले आहे.

मराठा क्रांती मोर्चासाठी कार्यकर्त्यांची बैठक होऊन तालुक्यात संदेश देण्यात आला. त्यानुसार नियोजन झाले .

संगमनेरात मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी सुमारे ८ हजार पत्रके  वाटून प्रचार केला.

त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात संदेश गेला. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.  त्यानुसार संगमनेरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे नियोजन सुरु होते. काही कार्यकर्ते सकाळीच मुंबईला रवाना झाले तर काही जण सायंकाळी निघणार आहे.

स्वयंमसेवक राजेंद्र देशमुख, शरद थोरात, अजित काकडे, अमोल कवडे व अन्य कार्यकर्ते रवाना झाले आहे.

LEAVE A REPLY

*