नगरमधून दुपारपर्यंत पाचशेहून वाहने मुंबईच्या दिशेने; पनवेल, सानपाडाच्या वाहनतळावर नगरच्या शेकडो गाड्या

0

 पनवेल, सानपाडाच्या वाहनतळावर नगरच्या शेकडो गाड्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासीक मराठा क्रांती मार्चासाठी मंगळवारी सकाळपासून दुपारी चारपर्यंत शेकडो वाहने नगर शहरातून मुंबईच्या दिशेने धावत  धावत आहेत. बुधवारी मुंबईच्या ऐतिहासीक आझाद मैदानावर राज्यातील लोखो मराठा बांधवांचा ऐतिहासिक मोर्चा होणार आहे. या ऐतिहासिक घटनाचा हिस्सा होणार्‍यासाठी शहरातील हजारो तरूण चारकी वाहनांने मुंबईच्या दिशेने निघाली आहेत. दुपारी चारच्या जवळपास नगर शहरातील तरूण ऐक्सप्रेस हायवेपर्यंत पाहेचली असून तेथून वाहतूक संथ झाली असल्याची माहिती नगरसेवक निखल वारे यांनी दिली.

दरम्यान, नगर जिल्ह्यातून जाणार्‍या वाहनांना कामोठे, सानपाडा आणि पनवले या भागात वाहनतळासाठी जागा दिली आहे. त्या ठिकाणी हजारोच्या संख्याने एमएच १६ आणि एमएच १७ हे नंबर असणार्‍या गाड्या उभा करण्यात आल्याची माहिती राजेश परकाळे यांनी दिली. नगर शहरातून सकाळी ७ पासून मराठा बांधव चारचाकी वाहनातून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. साधारण पुण्यापासून वाहतूक कोंडीला सुरूवात झाली असून यामुळे काही नगरकरांनी पुण्यात वाहने लावून पुण्यातून रात्री उशीरा अथवा उद्या सकाळी पहाटे मुंबईकडे रेल्वेने जाण्याचा निर्धार केला असल्याची माहिती राजेश परकाळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*