मराठा मोर्चातील रणरागिनीचा शनैश्‍वर देवस्थानकडून सन्मान

0

सोनई (वार्ताहर) – मुंबई येथेे 9 ऑगस्टला झालेल्या मराठा क्रांती महामूक मोर्चामध्ये नगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत भाषण केलेल्या सोनईची रणरागिनी राणी माधव दरंदले हिचा शनैश्‍वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात ओम शांतीच्या केंद्रप्रमुख उषा दिदी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

राणी दरंदले म्हणाली की, कन्या विद्यालयात शिक्षण घेताना मुख्याध्यापिका नागपुरे व शिक्षक अप्पासाहेब शेटे यांच्या प्रोत्साहानामुळे वक्ृत्वाची आवड निर्माण झाली. ग्रामीण भागातील प्रश्‍न व समस्या प्रत्यक्ष अनुभवल्याने मनातील खदखद भाषणातून व्यक्त केली. मुंबई येथेे झालेल्या मराठा क्रांती महामूकमोर्चामध्ये आझाद मैदानावरील व्यासपीठावरील केलेले 12 मिनिटांचे भाषण तिने पुन्हा करून दाखविले.

सीताराम तुवर यांनी प्रास्तुवक केले. यावेळी शनैश्‍वर देवस्थानचे माजी अध्यक्ष दादासाहेब दरंदले, विश्‍वस्त अप्पासाहेब शेटे, सहायक कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले, नेवासा पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष विनायक दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, उपव्यवस्थापक अनिल दरंदले, पुनम दरंदले आदी उपस्थित होते. आभार नितीन शेटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*