अकोलेमधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना

0
अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे मराठा मोर्चासाठी तालुक्यातील सुमारे 350 गाड्या व चार मोठ्या बसेस मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक डॉ.संदीप कडलग यांनी दिली.
मोर्चासंदर्भात तहसिलदार मुकेश कांबळे यांना मराठा समाजाच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले होते. तालुक्यात प्रमुख गावांत मोर्चाच्या अनुषंगाने बैठका घेण्यात आल्या व जनजागृती करण्यात आली आहे.
या मोर्चासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब उर्फ लालु दळवी, डॉ. संदिप कडलग , भानुदास गायकर, दिलीप शेणकर ,रोहीदास धुमाऴ , राज गवांदे, ओम काळे, भाऊसाहेब वाकचौरे, विश्वासराव आरोटे, व्ही. एस. गायकवाड , निलेश तळेकर, भुषण वाकचौरे, भूषण जाधव, महेश हासे, ऋषीकेश नाईकवाडी, चैतन्य पांगरे, नारायण डोंगरे, चंद्रभान सोनवणे, गोरख सोनवणे, सूर्यभान सहाणे, सुनील गवांदे, विजय गवांदे, संतोष शेटे, मोहन गायकर, गणेश गायकर, मंगेश फापाळे, अभिजित देशमुख यांसह शेकडो  मराठा बांधव काल मुंबई येथे दाखल झाले आहेत.
दरम्यान राज्य समन्वयक डॉ संदीप कडलग यांनी मनोगत व्यक्त करणार्‍या विद्यार्थीनींना मुबंई येथे सायंकाळी मार्गदर्शन केले. उद्या गुरुवारी तालुक्यातील प्रवरा, आढळा, मुळा या विभागातील शेकडो मराठा समाज बांधव मुंबईकडे ला रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

*