मराठा क्रांती मोर्चा : पारनेरमध्ये युवकांचा प्रचार रथ

0
पारनेर (प्रतिनिधी) – मुंंबईत येत्या 9 ऑगस्ट रोजी निघणार्‍या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चासाठी पारनेरमधील युवकांनी जनजागृतीसाठी प्रचाररथ तयार केला आहे. प्रत्येक मराठा माणसापर्यंत मराठ्यांचे प्रश्न पोहोचविण्याचा प्रयत्न या प्रचार रथाद्वारे केला जाणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्यव्यापी आयोजन मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी पारनेरमधील सागर कासार याने स्वत:चे वाहनाचा प्रचार रथ तयार करून धीरज महांडुळे व मित्रांनी संपूर्ण तालुक्यात जनजागृती सुरू केली आहे़.

रविवारी पारनेर येथील आठवडे बाजारात जनजागृती रथाचे मराठा क्रांती मोर्चाचे अभय गट, गणेश कावरे, सागर वैद्य, रायभान औटी, प्रवीण औटी, नाना हांडे यांनी स्वागत करून मराठा मोर्चाचे पत्रक प्रत्येकापर्यंत पोहोचविले. सागर कासार व धीरज महांडुळे यांनी केलेल्या जनजागृती रथाचे अनेकांनी कौतुक केले.  ध्येयवादी मराठा तरुणांमुळे मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होईल, असा विश्वास गट यांनी व्यक्त केला़.

LEAVE A REPLY

*