राहात्यातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार

0
9 ऑगस्ट क्रांतिदिनी निघणार्‍या मराठा क्रांती महा मुकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.
शिर्डी (शहर प्रतिनीधी) – 9 ऑगस्ट क्रांतीदिनी होणार्‍या मुंबईच्या मूकमोर्चात राहाता तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती तालुक्यातील आयोजकांनी दिली.
मुंबई येथे 9 ऑगस्ट क्रांतिदिनी रोजी निघणार्‍या मराठा क्रांती महा मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या मूकमोर्चासाठी मुंबईला हजारो समाज बांधव जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती महा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राहाता तालुक्यातील सकल मराठा समाजाची साकुरी येथील सिध्द संकल्प लॉन्स येथे 2 ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक संजीव भोर यांनी मुंबईच्या मोर्चा संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
तसेच तालुकाप्रमुख कमलाकर कोते, अ‍ॅड. धनवटे, नगरसेवक सुजित गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, कॉ. राजेंद्र बावके, सुनील दवंगे, सचिन चौगुले, डॉ. धनवटे, बाळासाहेब चव्हाण, वैभव कोते, कैलास कातोरे, निखिल वाबळे, डॉ. नचिकेत वर्पे, संदीप दंडवते, दशरथ गव्हाणे, धनंजय निबे आदींनी मोर्चा संदर्भात महत्त्वाच्या सूचना करत मोर्चा यशस्वी करून ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
मूकमोर्चाची जी आचारसंहिता ठरली आहे त्याच तंतोतंन्त पालन करावे, असे आवाहन केले. बैठकीस डॉ. राजेंद्र कोते, नगरसेवक शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, माजी नगरसेवक उत्तम कोते, दिनू कोते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, विजयराव काळे, संजय धनक, डॉ. घोगरे, बाबा बावके, सतीश नेहे, रामा दंडवते, अक्षय काळे, राहुल गोंदकर, गोरक्ष गोंदकर, पुंजा सदाफळ, संदीप बावके, अर्जुन जगताप, सुनील बोरकर,
महेश सदाफळ, सर्जेराव जाधव, अरविंद कोते, मयूर कडसकर, नवनाथ नळे, सचिन नळे, अरुण जाधव आदींसह मराठा तरुण उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी धनंजय निबे, शुभम वर्पे, प्रशांत काळे, प्रदीप शिरोले, अवि डांगे, दीपक जगताप, प्रवीण तुरकणे, किरण दंडवते, साईदीप पाटील, दिनेश रुकारे, राहुल जगताप, दीपक निरगुडे, आकाश कोते, गणेश कोते, युवराज डांगे, सुभाष सदाफळ, किरण कोते, संतोष डांगे, ऋषिकेश आगलावे, अक्षय कोते, मनोज मते, दीपक चौगुले, प्रकाश गोंदकर, रामदास डांगे आदींनी परिश्रम घेतले. आभार सचिन चौगुले यांनी मानले.

LEAVE A REPLY

*