सकल मराठा समाजाची 8 जुलै रोजी बैठक

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाच्या जिल्ह्यातील समाज बांधवांची बैठक येत्या 8 जुलै रोजी नगर येथे आयोजित करण्यात आली आहे.  8 ऑक्टोबर 2016 रोजी मराठा समाजाची बैठक नगर येथे झाली होती. त्यात अनेक विषयांचे ठराव संमत करण्यात आले होते.

याच बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचा हिशोबही देण्यात आलेला आहे. 8 ऑक्टोबरच्या बैठकीत झालेल्या विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी आता 8 जुलैची बैठक होत आहे.

जिल्हास्तरीय होणार्‍या या बैठकीला डॉक्टर, वकील, इंजिनियर, अधिकारी, व्यापारी, उद्योजक, शाासकीय-निमशासकीय कर्मचारी, पत्रकार तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व समाज बांधव यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. 8 जुलैला होणार्‍या बैठकीचे स्थळ व वेळ 1 जुलैपर्यत कळविण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

*