Friday, May 3, 2024
Homeजळगावमन्याड धरण १०० टक्के भरले

मन्याड धरण १०० टक्के भरले

चाळीसगाव | प्रतिनिधी chalisgoan

तालुक्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले मन्याड धरण हे गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी ८० ते ९० टक्के भरले होते. माणिकपुंज धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आज संकाळी मन्याड धरण पूर्णता; १०० टक्के भरले. धरणाच्या साढव्यावरुन आज संकाळी ६ वाजेच्या दरम्यान पाणी ओसंडून वाहू लागले.

- Advertisement -

या धरणावर २२ खेड्यांचा पाणी पुरवठा व सिंचनसाठीचे पाणी अवलंबुन आहे. सलग दुसर्‍या वर्षी मन्याड धरण १०० टक्के भरल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण हे ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील अतिरीक्त पाणी मन्याड धरणात येत आहे.

त्यामुळे धरणातील जलसाठा वाढल आहे. धरणाने शंभरी गाठल्यामुळे मन्याड धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून मन्याड नदीकाठावरील गावांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या